प्रिय दुर्गा,
जाऊदे...
इतकं सगळं सांगूनही एक गोष्ट मात्र कायम राहणार आहे —
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आणि हे तुला माहीतच आहे...
तुझ्याशिवाय राहणं मला खरंच जमत नाही.
सध्या माझी जी चिडचिड होते ना...
त्यामागेही एक छोटीशी गोष्ट आहे.
आपली भेट होत नाही...
तुला वेळ मिळत नाही...
आणि त्यामुळे कधी कधी माझी चिडचिड होते.
पण त्या चिडचिडीच्या मागेही
माझं तुझ्यावरचं प्रेमच असतं.
म्हणून माझ्याकडून कधी काही चूक झाली, काही चुकीचं बोललो किंवा काही चुकीचं वागलो तर मला सांगत जा.
मनात काहीही ठेवू नकोस.
‘असं नाही, असं झालं पाहिजे...’
तुला जे वाटतं ते मला सांग.
कारण तू सांगशील तरच मला समजेल ना...
तू काहीच सांगितलं नाहीस, तर मला कसं कळणार?
म्हणून एकच सांगतो —
मनात काहीही ठेवत जाऊ नकोस.
आपण बोलत राहू...
एकमेकांना समजून घेत राहू...
आणि एकमेकांची साथ देत राहू. ❤️
बस...
खूप झालं आता. 😄
परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️
अशीच कायम आनंदी राहा...
अशीच हसत राहा...
आणि आयुष्यात कितीही काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव —
मी तुझ्यासोबत आहे.
कधीही...
कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग.
काहीही असो...
तुझ्यासाठी मी आहे. ❤️
— तुझाच